Type to search

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न – आ.डॉ.तांबे

maharashtra धुळे

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न – आ.डॉ.तांबे

Share
धुळे । राज्यातील विनाअनुदानित अंशत अनुदानित शाळांमध्ये 21 नोव्हेबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा केला असून यापुढे ही प्रयत्न करणार असल्याचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी सांगितले.

आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी रायातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, अंशत अनुदानित व यासंबंधी तुकड्यावर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी हा आग्रह कायम ठेवला आहे. याबाबत वेळोवेळी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून बैठका घेतल्या आहेत. शिक्षण आयुक्तांनाही अनेक वेळा निवेदने दिली आहेत.

विना अनुदानित शाळांवर अनेक कर्मचारी खुप दिवस अत्यंत कमी पगारात काम करतात. व निवृत्ती नंतर ही त्यांना अत्यंत कमी पेन्शन मिळाली तर त्यांच्यावर मोठा अन्याय होणार आहे. म्हणून सर्व कर्मचार्‍यांना जुनीच पेन्शन योजना सुरु करावी. ही योजना लागू व्हावी या संदर्भातील पुढील दिशा ठरविण्यासाठी मुंबई येथे 21 मे 2019 रोजी सर्व शिक्षक आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. वेळोवेळी पाठपुरावा करूनही शाळांचे प्रश्न, शाळांचे अनुदान, शाळा व्यवस्थापन खर्च, शिक्षकांच्या नियुक्त्या असे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. मुळात गोरगरिबांच्या शिक्षणाकडे या शासनाचा पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन असल्याने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय प्रलंबित ठेवले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सर्व संघटनांसह न्यायालयीन लढाई सुद्धा केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!