आ.कुणाल पाटील यांना भुजबळांचे आशीर्वाद

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घेतली भेट

0
धुळे । धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवाराचा पराभव करून निश्चित विजयी व्हा असे आर्शिवाद राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आ.कुणाल पाटील यांना दिले आहेत. आघाडीचे उमेदवार आ.कुणाल पाटील यांनी दि. 20 मार्च रोजी सकाळी 11 वा. नाशिक येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली.

तब्बल तासभराच्या भेटीत छगन भुजबळ यांनी आ.कुणाल पाटील यांना निवडणूकी संदर्भात कानमंत्रही दिले. लोकसभेच्या निवडणूकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकजूटीने, एकदिलाने काम करुन शेतकरी विरोधी भाजपाला देशातून, राज्यातून हटावायचे निर्धार त्यांनी बोलून दाखविला.

उत्तर महाराष्ट्रातील कापूस आणि कांदा पिकांचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. मात्र, शेतकर्‍यांच्या मालाला भावच नाही, असंख्य शेतकर्‍यांना त्यांनी पिकविलेला कांदा भावा अभावी फेकावा लागला. परिणीमी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य गोरगरीब जनता वाचवायची असले तर भाजपाला हटविणे हाच पर्याय असल्याचे यावेळी श्री.भुजबळ यांनी सांगितले.राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच जास्त जागा निवडूण येतील असा विश्वास व्यक्त करीत आ.कुणाल पाटील यांना विजयाचा आशिर्वाद देण्यासही ते विसरले नाहीत. याप्रसंगी नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*