Type to search

maharashtra धुळे मुख्य बातम्या

माझी अंत्ययात्रा काढणार्‍या माता, भगिनी आता गप्प का?

Share
धुळे । वर्षभरापूर्वी मी सौम्य शब्दाचा वापर केला होता. आता तर, चौका-चौकात वारकर्‍याचे किर्तन ऐकवले जात आहे. आता तोच मे महिना, तोच कालावधी, तोच विषय आहे. तेव्हा मला सभ्यतेचे धडे देणारे आणि माझी अंत्ययात्रा काढणार्‍या त्या माता, भगिनी आता गप्प का? असा संतप्त सवाल आ. अनिल गोटे यांनी प्रसिध्द पत्रकातून केला आहे.

पांझरा नदी काठालगत धुळेकर जनतेच्या सोयीसाठी होत असलेल्या रस्त्यात येणारी बेकायदेशीर बांधलेली मंदिरे स्थलांतरीत करावीत, ऐवढीच माझी रास्त मागणी होती. त्यात माझा कुठला व्यक्तीगत स्वार्थ होता? रस्ता कामामुळे आता राजकीय अस्तीत्वच संपुष्टात येते की काय अशी धडकी विरोधकांना भरली. त्यामुळे त्यांनी महिलांना पुढे करत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दि. 24 मे रोजी जीवंतपणी माझी अंत्ययात्रा काढली. बांगड्या फोडल्या.

खोट, खोट का होईना या माता, भगिनी रडल्या! आता तीन दिवसांपासून बंटी पाटलाची क्लीप व्हायरल होत आहे. भाजपाच्या नगरसेवकाला जाब विचारणार्‍या बंटी पाटील यांना प्रत्यूत्तर देतांना संबंधीत नगरसेवकाने शिव्या, अश्लील शब्दाचा वापर केला आहे. याबाबत शहरात जोरदार चर्चा असून याचाच धागा पकडत श्री.गोटे यांनी पत्रक प्रसिध्दीला दिले आहे. माझी अंत्ययात्रा काढणार्‍या माता, भगिनी आपण आता गप्प, शांत का?, ‘त्या’ रणरागिणी आता कुठे बेपत्ता झाल्यात? असा उपरोधीक सवाल अनिल गोटे यांनी पत्रकात केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!