Type to search

maharashtra धुळे

शंकराची मूर्ती काढण्याची मनपा आयुक्तांना घाई

Share
धुळे । पांझरा नदी पात्रात उभारण्यात येत असलेल्या झुलत्या पुलावरील भगवान शंकराची मूर्ती काढण्याची मनपा आयुक्तांना घाई झाली आहे. या संदर्भात न्यायालयाचा मनाई हुकूम असतांना अधिकारी आणि सरकारी वकिलांची यासाठी बैठक व्हावी हे एक दुर्दैव आहे. विकृतांची मनोकृती स्वत: काही करीत नाही आणि दुसर्‍या काही करु देत नाही, या पुर्वी शहरातील चौपाटी पाडून विकृत आनंद घेणार्‍यांनी पालिकेतर्फे बगीचा करण्याच्या वल्गना केल्या होत्या. आता त्यांनी शंकराला तिसरा डोळा उघडायला लावू नये असा इशारा आ. अनिल गोटे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

आ. अनिल गोटे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरात गेल्या सत्तर वर्षात विकासाची कामे झाली नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. असे असतांना जी कामे होत आहेत त्या कामांनाही विरोध होत आहे. कुठल्याही कामात वापर होत नसलेल्या दगडांच्या खाणींच्या जागेत कल्पकतेने निर्माण करायच्या सफारी गार्डनला विरोध केला पण शिवतीर्थाची निर्मिती, परमवीर चक्र अब्दुल हमीद स्मारकाची निर्मिती, गुरु शिष्य स्मारकाची निर्मिती, अग्रसेन स्मारकाची निर्मिती, भीम तीर्थाची निर्मिती, गोल चौकीची उभारणी, आझादनगर पोलीस स्टेशनची शानदार इमारत उभारली. पांझरा नदीच्या दोन्ही काठाने साडेपाच, साडेपाच असे अकरा किलो मिटर्स लांबीच्या रस्त्याच्या प्रकल्पाला हाय पॉवर कमिटीने परवानगी दिली. स्वतः मुख्यमंत्र्यांनी निधी दिला. भूमीपूजन केले. अकरा किलोमिटर्स लांबीच्या रस्त्यासाठी एकाही खासगी मालकीची एक चौरस फूट जागा घेतली नाही. पुर्ण रस्ता शासकीय जागेतून केला तरीही विरोध करण्यात आला. झुलत्या पुलाचा प्रकल्प मंजुरीत तेवीस फुटाचे शिल्प गृहीत धरण्यात आले. पर्यटन स्थळ या संकल्पनेस राज्य शासनाने मंजुरी दिली. तसेच आराखडे राज्याच्या सचिवांनी मंजूर केले. मुख्य अभियंत्यांनी आराखडे मंजुर केले. ऐशी फूट लांब ऐशी फूट रुंद, सहा हजार चारशे चौरस फुटाचा , साडे सहा फूट जाडीचा, कुठल्याही आधाराशिवाय केवळ एका पिलरवर उभारण्यात येणार्‍या प्लॅट फॉर्मवर मूर्तीचे वीस टनाचे वजन मंजूर ड्रॉईंग मधे आहे. शिवरात्रीला शहराच्या प्रमुख रस्त्यांवरुन शिल्पाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शिल्पाची उंची तेवीस फुटाची असल्याने उभी करुन मिरवणूक काढू नये प्रशासनाने केलेल्या विनंतीचा स्विकार करुन शिल्प आडवे ठेवून नदी पात्रात आणण्यात आले. महाशिवरात्रीपासून शिल्प नदी पात्रात होते. आता तेवीस फूट उंच शिल्प नदी तळापासून बत्तीस फूट उंचीवर विधीवत ठेवताच तक्रारींचा पाऊस पडला.

वस्तुतः नदी पात्राशी महापालिकेचा संबंध घाण साफ करण्या पुरताच असतो. दि 17 एप्रील रोजी शिल्प प्लॅटफॉर्मवर चढविण्यात आले. आणि दिलीप साळुंखे यांना बंधकाम विभागाने मूर्ती काढून घेण्यासंबधी नोटीस दिली. परंतु न्यायालयाने मनाई हुकूम दिला आहे. तरी आयुक्तांवर मूर्ती काढण्यासाठी दबाव आणायला सुरूवात झाली. न्यायालयाने मूर्ती उचलण्या संबंधात मनाई हुकूम दिला आहे. तोच विषय घेवून उपायुक्त श्री. गोसावी यांच्या स्वाक्षरीने मिटींग बोलविली. एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षाचा दबाव असल्याचे अधिकारी सांगतात. हे खरे काय? धुळेकरांना कळू द्या, हिम्मत असेल तर तुम्हाला कोणाचा निरोप आले, कोणी फोन केले हे जाहीर करावे असे पत्रकात म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!