धुळे । मनपा निवडणूकीत दिलेल्या अपमानजनक वागणूकीमुळे स्वकियांवर नाराज असलेले भाजपा आ.अनिल गोटे यांनी आज 26 वर्षानंतर आपले राजकीय हाडवैर विरसरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घराचे दार मदतीसाठी ठोठावले आहे. भाजपाचे विद्यमान खासदार डॉ.भामरे यांचा पराभव हेच आपले एकमेव ध्येय असून ते साध्य करण्यासाठी आपण काहीही करू शकतो असे आ.गोटे यांनी पवारांच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.

शरद पवार आणि आ.अनिल गोटे यांच्यातील वितृष्ट गेल्या 26 वर्षापासून उभ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. बनावट स्टॅम्प घोटाळा उघळ झाला, नंतर याप्रकरणात आ.गोटे यांनाही तुरूंगवारी घडली. यासर्व प्रकरणात आ.गोटे यांचा शरद पवार यांचावर रोष होता. म्हणूनच तेलगी प्रकरणात थेट शरद पवार यांच्यावरच आ.गोटे यांनी शाब्दीक हल्ला चाढविला होता. आ.गोटे यांनी केलेल्या आरोपांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ निर्माण झाली होती. तेव्हापासून शरद पवार आणि आ.गोटे यांच्यातील वितृष्ट वाढतच गेले होते.

या पार्श्वभूमीवर आ.अनिल गोटे आज शरद पवारांची भेट घेणार या वृत्ताने मुंबईसह जिल्ह्यातील माध्यमांचे लक्ष या भेटीकडे लागले होते.

आ.गोटे नियोजीत वेळेला शरद पवारांच्या मुंबई येथील निवासस्थानी दाखल झाले. पवार आणि गोटे यांनी बंदव्दार चर्चा केली. पवारांच्या भेटी नंतर बोलतांना आ.गोटे यांनी स्पष्ट केले की, भाजपाचे विद्यमान खा.डॉ.सुभाष भामरे यांच्यामुळे धुळ्यात गुंडगिरी, भ्रष्टाचार वाढला असून डॉ.भामरे यांच्या पराभवसाठी मदत करावी अशी भुमिका आपण शरद पवार यांच्याकडे मांडली. श्री.पवार यांनी आपले म्हणणे ऐकून घेतले. 2ा6्र येथे आघाडीचा उमेदवार असल्याने त्यांनी कोणताही शब्द दिला नाही. भाजपाचा पराभव हा आमच्या दोघांचा एकच उद्देश असल्याने कुणी कुणाला कशी मदत करायची हे आगामी काळात ठरवू. यासाठी आपण पुन्हा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे आ.अनिल गोटे यांनी सांगितले. शरद पवार यांच्याकडून मात्र, या भेटीबाबत कोणताही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

डिपॉझिट वाचवाच!
आ.अनिल गोटे निवडणूक लढविणार असतील तर त्यांनी शुभेच्छाच असतील. कितीही प्रयत्न केला तरी भाजपाचे विद्यमान खा.डॉ.सुभाष भामरे यांचा पराभव ते करूच शकत नाही. या उलट त्यांनी निवडणूक लढून स्वत:ची डिपॉझिट वाचवून दाखवावी अशा शब्दात राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी आ.गोटे यांना पुन्हा डिवचले आहे. मनपा निवडणूकीतही एकही जागा जिंकणार नाहीत असे आपण त्यांना आधीच सांगितले होते मात्र, ते लढले आणि कसेबसे एका जागेवर विजयी झाले होते यांची आठवणही ना.महाजन यांनी करून दिली.

प्रकृती सांभाळा!
आ.अनिल गोटे यांचे वय झाले आहे. त्यांनी आता आव्हानाची भाष करून नये. मनपा निवडणूकीत त्यांना धुळेकर जनतेने आस्मान दाखविले आहे. एकाचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही उमेदवाराला आपली साधी डिपॉझिट सुध्दा वाचविता आली नाही. ते काय बोलतात याकडे आपण लक्ष देत नाहीत. मात्र, आता वय झाले आहे, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या व्याधींनी तुम्हाला ग्रासले आहे. अशा परिस्थिती आता आराम करा, प्रकृतीची काळजी घ्या! असा डॉक्टर म्हणून माझा सल्ला असल्याची उपारोधीक टिका केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि भाजपाचे विद्यमान खा.डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*