Type to search

maharashtra आवर्जून वाचाच धुळे मुख्य बातम्या

मिसेस इंडीया स्पर्धेत स्वाती पाटील विजयी

Share
कापडणे । दुबई येथे झालेल्या माईलस्टोन मिस व मिसेस इंडिया इंटरनॅशनल- 2019 या सौंदर्य स्पर्धेत स्वाती जितेंद्र पाटील या विजयी झाल्या. स्वाती पाटील या वलवाडी(ता.धुळे) येथील रहिवाशी असुन सध्या नाशिक येथे वास्तव्यास आहेत.

या आंतरराष्टीय सौंदर्य स्पर्धेत कर्वी क्विन या प्रकारात स्वाती पाटील यांनी प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले तसेच रोल मॉडेल या किताबाच्या देखील त्या मानकरी ठरल्या.

स्वाती पाटील यांनी या अगोदर दूरदर्शन वरील व्हिल स्मार्ट श्रीमती या टि.व्ही.शोचे देखील विजेतेपद पटकावले होते. दुबई येथे पार पडलेल्या या माईलस्टोन मिसेस इंडिया इंटरनॅशनल- 2019 स्पर्धेसाठी, भारतातून एकूण 32 सौंदर्यवतींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रसिद्ध स्रियांनी परिक्षणाचे कामे केले. सर्व फेर्‍या पार करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवित स्वाती पाटील यांनी विजेते पद मिळविले. नाशिक, धुळे व जळगाव आदी भागातील महिलांमधुन पहिल्यांदाच अशा प्रकारच्या सौंदर्य स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

स्वाती पाटील या नाशिक जलसंपदा विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता जितेंद्र मुकुंदराव पाटील यांच्या पत्नी असून वाडीभोकर येथील रहिवाशी व सेवानिवृत्त नायब तहसिलदार एम.वाय.पाटील यांच्या सुन आहेत. तसेच चोपडाचे दिवंगत माजी आमदार माधवराव गोटू पाटील व शिंदखेड्याचे दिवंगत माजी आमदार रंगराव माधवराव पाटील यांच्या त्या नात असून चोपडाच्या माजी नगराध्यक्षा ताराबाई पाटील यांच्या स्वाती पाटील या कन्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!