Thursday, April 25, 2024
Homeधुळेधुळे : मेधाताई पाटकर पोहचल्या बिजासनी घाटात

धुळे : मेधाताई पाटकर पोहचल्या बिजासनी घाटात

मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश राज्यात जाणाऱ्या हजारो मजुरांना अडविले

धुळे :

- Advertisement -

आपआपल्या राज्यात परत जाऊ पाहणाऱ्या हजारो मजुरांना मुंबई आग्रा महामार्गावरील बीजसनी घाटात अडवून धरण्यात आ ले आहे.

या मजुरांना जाऊ द्यावे, यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर तिथे पोहचल्या असून मध्य प्रदेश सरकारशी त्यांचे बोलणे सुरू असल्याचे सांगितले जाते.

महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात रोजगारनिमित्त आलेले व आता लॉक डाऊनमुळे अडकून पडलेल्या हजारो मजुरांना आपआपल्या गावाकडे परतण्याची ओढ लागली आहे. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉक डाऊन कालावधीत त्यांचा रोजगार गेला, मालकाने परत जाण्यास सांगितले. खायला काही नाही, पैसे नाहीत.

प्रवासासाठी कोणतेही वाहन नाही आणि शासन, प्रशासनही मदत करत नाही म्हणून यापैकी असंख्य जण पायीच निघाले आहेत. मात्र त्यांना बीजसनी घाटात अडविण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी सातशे ते आठशे मजुरांना अशाच प्रकारे अडविण्यात आले होते.

त्यांनी रस्ता रोखो केले. त्यानंतर शिरपूरचे प्रांत डॉ. विक्रमसिह बांदल यांनी बडवाणीचे जिल्हाधिकारी अमित तोमर, पोलीस अधीक्षक डी आर तेनिवार यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावला होता. मात्र आता मध्यप्रदेश सरकार राजस्थान आणि उत्तरप्रदेश च्या मजुरांना प्रवेश देण्यास नकार देत असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या