Type to search

Breaking News maharashtra धुळे मुख्य बातम्या

धुळे : ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारी पिकअप पुलावरून कोसळली; सात मजूर ठार

Share

धुळे : जिल्ह्यातील बाेरी नदीत मजुरांना घेऊन जाणारा पिकअप उलटून सात मजूर ठार झाले असून २२ जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे.

दरम्यान मध्य प्रदेशातून उस्मानाबादकडे ऊसतोड मजूर घेऊन जाणारी पिकअप व्हॅन (एमएच २५ पी ३७७०) धुळे तालुक्यातील विंचूर शिवारातील पुलावरून कोसळली. पिकअप गाडीवरचा ताबा सुटल्याने सुटल्याने हा प्रघात झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर मजूर मालक तसेच वाहनचालक दोघेही फरार झाले आहेत.

अपघातातील जखमींना धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजला दाखल करण्यात आले आहे. २४ जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. सेंदवा येथील ढवळे विहिरी येथील राहणारे ऊस तोड कामगार हे उस्मानाबाद जिल्ह्यात ऊस तोडीसाठी जात होते. वाहनामध्ये ३० ते ३२ प्रवाशी होते. मध्यरात्री पुलावरील खड्डे असल्यामुळे ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

स्थानिक ग्रामस्थांनी घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळविल्याने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ . राजू भुजबळ, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी घनस्थळी धाव घेतली. पहाटे उशिरापर्यंत मदतकार्य करून जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!