वीजकामगारांची उद्या द्वारसभा

0
धुळे । दि.2 । प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य वीज अभियंता, कामगार, अधिकारी यांची संयुक्त कृती समितीची बैठक झाली. सदर सभेत धुळे जिल्ह्यासह पाच जिल्ह्यांचे विज वितरणाचे काम खासगी फ्रेंचाईशीकडे सोपविण्याचा वीज वितरणच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना पदाधिकार्‍यांनी सांगीतले की, सदर निर्णय घेण्यापूर्वी कंपनी प्रशासनाने कोणत्याही संघटनेच्या पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले नसल्यामुळे सदरचा निर्णयाचा निषेध करण्यात आला.

तत्पूर्वी बारामती झोनमध्ये तंत्रज्ञ कै.राहूल ढाके यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. जिल्ह्याचे वीज वितरण कंपनीचे काम खासगी कंपन्यांकडे सोपविण्यास सर्व संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. फ्रेंचाईशी ही फक्त कर्मचारी, अधिकार्‍यांसाठीच नव्हे तर ग्राहकांसाठी देखील घातक असल्याचे मत मांडण्यात आले.

जळगाव व औरंगाबाद शहरांचे देखील फ्रेंचाईशीकरण करार रद्द करुन पुन्हा महावितरण कंपनीकडे काम सोपविले गेल्याने पुन्हा कंपनी प्रशासन जिल्ह्याचे फ्रेंचाईशीकरण करण्याबाबत आग्रही का? अशी बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

धुळे जिल्ह्याचा विचार करता फ्रेंचाईशीकरण हिताचे नसून त्यामुळे प्रत्येlabourक ग्राहक व कर्मचार्‍याच्या हक्कावर गदा येण्याची भिती बैठकीत व्यक्त करण्यात आली.

फ्रेंचाईशीकरणाला प्रतिकार करण्यासाठी सदर निर्णय रद्द होण्यासाठी सर्व संघटनांनी दि.4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता इंदिरा गार्डनजवळील मंडळ कार्यालय येथे द्वारसभेचे आयोजन करण्यात आले.

बैठकीस एसईएचे श्री.चितोडकर, एम.आर.पवार, कामगार महासंघातर्फे बी.एन.पाटील, चतुर सैंदाणे, बाळासाहेब निकम, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनतर्फे प्रविण पाटील, संतोष ठाकरे, आर.एफ.पाटील, वर्कर्स फेडरेशनतर्फे बी.डी.पाटील, दीपक सोनवणे, इंटक संघटनेचे श्री.पारोळेकर, नंदू बडगुजर, सिताराम बोरसे आदींनी सहभाग घेवून निर्णय घेण्यात आला.

 

 

LEAVE A REPLY

*