Type to search

मनपा पथकाने देवपूरात अतिक्रमण काढले

maharashtra धुळे

मनपा पथकाने देवपूरात अतिक्रमण काढले

Share
धुळे । महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने आज देवपूरात दोन ठिकाणी अतिक्रमणे काढली. यावेळी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

शहरातील देवपूर परिसरातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाजवळ असलेले दानेश टायर दुकान अतिक्रमणमध्ये येत असल्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने आज जेसीबीद्वारे जमीनदोस्त केले.तर देवपूरातीलच अंडाकृती बगीचाजवळ असलेले दुकान देखील आज जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. यावेळी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रसाद जाधव व अन्य कर्मचारी उपस्थित होते. शहरात यापुढेही अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविली जाईल असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!