शहरातील अवैध धंदे बंद करा! – लोकसंग्राम

0
धुळे । दि.26 । प्रतिनिधी-शहरात गावठी दारुचे अड्डे, गांजा, भांग विक्री, सट्टा पिढ्या, रॉकेलचा काळा बाजार, गॅस सिलींडरचा काळा बाजार, डांबरचा काळा बाजार, पानपट्टया व हातगाड्यांवर दारु विक्री व सट्टा केंद्र इत्यादी प्रकार राजरोस सुरु आहेत.
शहरातील नेहरु चौक, जयहिंद चौक, एसएसव्हीपीएस महाविद्यालय चौक येथे पूलगेम, डॉटगेम आदी सुरु आहेत. विद्यार्थीनींना पाहून मोटारसायकलचा हॉर्न वाजविणे, कट मारणे, अश्लील हावभाव करणे, छेड काढणे आदी प्रकार सुरू आहेत.

धूम स्टाईल चोर्‍या वाढल्या आहेत. लोकसंग्रामचे अवैध धंदे बंद करण्याची मागणी नेहमीच लावून धरली आहे. आमच्या मागणीला विरोधी पक्ष राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे.

त्यामुळे खालील ठिकाणी सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन लोकसंग्रामतर्फे पोलिस अधिक्षक एम.रामकुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.

येथे चालतो सट्टा
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरात पालाबाजार, दंडेवाले हॉटेल शेजारी, मनोहर चित्रमंदिर ते पाचकंदील पर्यंत आणि फ्रुट मार्केटमध्ये तसेच राजकमल चित्रमंदिराजवळील काही पानटपर्‍यांवर, मिरच्या मारोती चौक, शिरूड चौफुली, हॉटेल सननच्या बोळीतील एका पानटपरीवर, मोगलाई परिसर व जाळीच्या पुलाजवळ, साक्री रोडवरील सिंधी पंचायत भवनसमोरील काही पानटपर्‍यांवर स्टेशन रोडवरील एका बर्फ कारखान्याजवळ, चाळीसगाव रोडवरील कब्र्स्तानसमोर, अग्रवाल विश्रामसमोर, गल्ली क्र. 2 मधील बोलीत सट्टा मोठ्या प्रमाणावर सुरू असून बंद करण्यात यावा, अशी मागणी पत्रकात करण्यात आली आहे.

गांज, भांग, दारूविक्री
त्याचप्रमाणे शहरातील माधवपुरा भाग,हॉटेल शेरेपजाबच्या समोर, देवपुरातील नेहरू चौकात, पांझरा नदीकिनारी स्वामी समर्थ मंदिरासमोरील शौचालयांच्या बाजूला, सुरत बायपासवर असलेली चितोड चौफुली, नटराज चित्रमंदिराशेजारील दाळवाला प्लॉट भागात गांज, भांग आणि दारूची खुलेआम विक्री होत असल्याचे पत्रकात म्हटले असून याबाबत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकात करण्यात आली असून पत्रकावर प्रशांत भदाणे, अमोल सूर्यवंशी, डॉ.अनिल पाटील, मनोज वाल्हे, बाळू शेंडगडे, दिपक जाधव, स्वप्निल बहाळकर, छोटू गवळी, मयूर खैरनार, अविनाश लोकर, सचिन सूर्यवंशी, प्रकाश महानोर, शकील भाई, शकील भाई, सुनिल चौधरी, नंदकुमार नामदेव, सचिन पोतेकर आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

LEAVE A REPLY

*