Type to search

Breaking News धुळे

डॉ.एन.के.ठाकरे यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड

Share

धुळे – 

उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांना लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड फॉर रिसर्च अ‍ॅण्ड सर्विस टू इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

डॉ.एन.के.ठाकरे यांनी  मुंबई विद्यापीठाच्या गोवा केंद्रात ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांनी 1969 ते 1977 या कालावधीत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, 1977 ते 1982 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे गणित विषयाच्या अध्यापनातून पदवीत्तर वर्गांना लाभ मिळवून दिला.

अध्यापनाचे कार्य करत असतांनाच 1972 मध्ये कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून पीएच. डी. पदवी प्राप्त केली.  येथील जयहिंद शैक्षणिक संस्थेने जयहिंद महाविद्यालयाचे डॉ. ठाकरे यांनी प्राचार्य म्हणून काम पाहिले. अध्यापनाच्या ध्यासातून 1985 मध्ये गणिताच्या ज्ञानदानासाठी पुणे विद्यापीठातील लोकमान्य टिळक अध्यासनावर डॉ. ठाकरे सरांची प्राध्यापक म्हणून निवड झाली.

डॉ. ठाकरे यांचे  आजपर्यंत 200 पेक्षाजास्त शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून प्रसिद्ध झाले आहेत. या शोधनिबंधात भारताबाहेरील सहलेखक इझुरू फुजीवारा (जपान), सुईचीरो मायदा (जपान) यासारख्या गणिततज्ज्ञांचा समावेश आहे.

डॉ. ठाकरे यांचे प्रमुख संशोधन स्पेशल फंक्शन, कॉम्प्लेक्स अनालिसिस, फंक्शनल अनालिसिस, लॅटिस थेअरी, एनुमरेषण या गणिताच्या उपशाखांमध्ये आहे.

स्पेशल फंक्शन्स या विषयातील संशोधन गुणवत्तेमुळे काही संज्ञा त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत. इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीसाठी केलेल्या प्रदीर्घ कार्यामुळे व संशोधनासाठी डॉ. ठाकरे यांचा  पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

आयआयटी खरगपूर (प.बं.) येथे इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीचे अधिवेशन दि. 22 नोव्हेबर रोजी आयोजित केले असून त्यात पुरस्कार वितरण होणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!