पटेल परिवाराच्या आर्थिक मदतीमुळे बालकाला जीवदान

0
शिरपूर । गुदद्वार नसणे, या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या मांजरोद (ता.शिरपूर) येथील एक वर्षीय मुलास शिरपूर नगर पालिकेचे उपाध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे जीवदान लाभले.

भटू संदीप धनगर (वय 1 वर्ष) हा मांजरोद येथील बालक जन्मताच गुदद्वार नसणे, यासारख्या दुर्धर आजाराने ग्रासला होता. शिरपूर, धुळे, जळगाव येथे डॉक्टरांना दाखवले असता त्यांनी मुंबई अथवा पुणे येथे शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. शस्त्रक्रियेला सुमारे 2 लक्ष रुपये एवढा खर्चिक असल्यामुळे वडील संदीप धनगर हताश झाले.

त्यांनी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांना सर्व परिस्थिती सांगितली. भटू धनगर याच्या शस्त्रक्रियेची निकड, त्याच्या कुटुंबाची अवस्था याबाबत भुपेशभाई पटेल यांनी आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्याशी चर्चा करून भटूला नासिक येथील अत्याधुनिक रुग्णालयात दाखल केले.

तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने व भटू धनगर याला जीवदान लाभल्याने वडील संदीप धनगर व मांजरोद परिसरातील ग्रामस्थांनी आ.अमरीशभाई पटेल, आ.काशीराम पावरा, भूपेशभाई पटेल, तपनभाई पटेल यांचे आभार मानले.

दोन महिन्यांनी भटूवर पुन्हा दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्या साठीही सुमारे 2 लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे. तो खर्च सुद्धा पटेल परिवार करणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी स्वीय सहायक अशोक कलाल, सुनील जैन, रुग्णमित्र दिलीप माळी यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

*