शिरपूर पेट्रोल पंपावर दरोडा

0
धुळे / शिरपूर शहरातील शहादा रस्त्यावरील पेट्रोल पंपावर आठ दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून कर्मचार्‍यावर तलवारीने हल्ला करुन 17 हजाराची रोकड लाबविली.
या प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात परस्पर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, शिरपूर शहरातील शहादा रस्त्यावर कर्मवीर पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बबन गुलाब भिल, लोटन धनगरसह सहा जण आले त्यांनी वाहनात पंपावरुन पेट्रोल भरले त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचारी उमेश पाटील यांनी त्यांच्याकडे पैसे मागितले असता लगेचच तलवारीने हल्ला करुन उमेश पाटील यांच्याजवळील 17 हजाराची रोकड घेवून दरोडेखोर पळाले.

याबाबत शिरपूर पोलिस ठाण्यात उमेश पाटील यांनी फिर्याद दिली. भादंवि 141, 147, 149, 326, 395, 504 प्रमाणे बबन गुलाब भिल, लोटन धनगर, प्रदीप भिल, गौतम बबन भिल, अविनाश भिल, विलास भिल, पंकज थोरात, अतुल वाघ यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

तर बबन भिल यांनी परस्पर तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे की, मोटार सायकलीमध्ये 200 रुपयांचे पेट्रोल टाकले.

त्यानंतर संबंधिताला 500 रुपयाची नोट देवून 200 रुपये परत मागीतले याचा राग येवून पेट्रोल पंपावरील उमेश संजय पाटील, घनश्याम मराठे, प्रमोद पाटील, राहुल रंधे, निशांत उर्फ बंडू रंधे व अन्य चार जणांनी बबन भिल यांना मारहाण केली. त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले व जातीवाचक शिवीगाळ केली.

त्यांच्या तक्रारीवरुन भादंवि 143, 141, 147, 149, 504, 325, 395 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*