आ.अमरिशभाईंच्या मार्गदर्शनाखाली शिरपुरचा देशभरात सन्मान

0
शिरपूर / युवक काँग्रेसच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य हाती घेवून यूवा शक्तीकडून शिरपूर शहर व तालुक्यात समाजोपयोगी कामे व्हावीत. आ. अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूरचा देशभरात सन्मान होत असल्याची बाब सर्वांसाठी गौरवास्पद आहे.
शहरात व तालुक्यात सर्वत्र स्वच्छतेसह शिरपूर पॅटर्न अंतर्गत पाण्याचे काम, जलपुनर्भरण तसेच उच्चशिक्षणाचे कार्य खूपच चांगल्या रितीने सुरु आहे. युवकांनी व नागरिकांनी जातीभेद न करता शहरात शांतता कायमस्वरुपी अबाधित राहण्यासाठी नेहमीच सलोख्याचे वातावरण टिकवून ठेवावे. शिरपूरच्या विकासासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी केले.

शिरपूर शहरात इदगाहनगर व शहीद अ.हमीदरोड या दोन ठिकाणी युवक काँग्रेस शाखा फलक अनावरण व युवक काँग्रेस मेळावा घेण्यात आला.

त्यावेळी भुपेशभाई पटेल हे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे आ.काशिराम पावरा होते. काँग्रेस शाखाफलक अनावरण प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*