एस.टी.कर्मचार्‍यांना भत्त्याची रकम मिळणार

0
धुळे / एस.टी. कर्मचार्‍यांना महागाई भत्त्याची उर्वरित रकम जून 2017 च्या पगारात मिळणार आहे.
राज्य शासनाने दि.1 जानेवारी 2016 पासून मूळ वेतनावर अनुज्ञेय होणार्‍या महागाई भत्त्यात 6 टक्के वाढ केलेली होती.
त्यानुसार महागाई भत्त्याचा दर दि.1 जानेवारी 2016 पासून 119 टक्क्यांवरुन 125 टक्के असा झालेला आहे. परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या आदेशान्वये रा.प. महामंडळातील अधिकारी, कर्मचार्‍यांना महागाई भत्त्याचा दर राज्य शासनानुसार देण्याचा निर्णय एस.टी. प्रशासनाने घेतला होता.

त्यानुसार सप्टेबर 2016 पासून सर्व रा.प. कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 119 टक्के वरुन 125 टक्के इतका करण्यात आला. तत्पूर्वी जानेवारी ते ऑगस्ट 2016 या आठ महिन्याच्या कालावधीतील थकीत महागाई भत्त्याची रकम रा.प. कर्मचार्‍यांना त्यांच्या कौटुंबीक खर्चाला योग्यरित्या उपयोगी पडेल अशा रितीने विभागून द्यावी.

जेणे करुन सणासुदीला त्यांना ही रक्कम उपयोगी पडेल, अशी सूचना श्री.रावते यांनी दिल्या होत्या. त्यानुसार त्यापैकी 25 टक्के रकम म्हणजे जानेवारी व फेब्रुवारीची थकित महागाई भत्ता सन 2016 च्या गणपती उत्सवापूर्वी व उर्वरित सहा महिन्याच्या महागाई भत्ता रा.प. कर्मचार्‍यांना त्यांच्या मुलांना शाळा सुरु होतांना त्यांच्या शालेय खर्चासाठी उपयोगी पडावा, या उद्देशाने जून 2017 च्या पगारात देण्यात येणार आहे.

अशा रितीने थकित रकमेचा वापर रा.प. कर्मचार्‍यांनी त्यांच्या गरजेनुसार व समयसूचकतेने करावा, अशी भावना अध्यक्षांनी व्यक्त केली होती. त्यानुसार सदर रकम रा.प.कर्मचार्‍यांना अदा करण्यात आली. या निर्णयाबाबत कामगार वर्गातून ना.दिवाकर रावते यांचे आभार मानण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

*