देना बँकेची पावणेचार कोटीत फसवणूक

0
नंदुरबार / नवापूर तालुक्यातील एका दुध डेअरीने देना बँकेची तब्बल पावणेचार कोटी रूपयाची फसवणूक केल्याप्रकरणी दुध डेअरीच्या पाच संचालकांविरूध्द विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नवापूर तालुक्यातील कडवान येथील साई गोस्वामी दुध डेअरी व कृषी उत्पादक लिमीटेड संस्थेने देना बँक शाखा साक्री येथून दुध डेअरीच्या मशिनरीसाठी तीन कोटी 73 लाख रूपयांचे कर्ज घेतले होते.

त्यासाठी त्यांनी लहान कडवान शिवारातील गट नं. 18/1 मधील जमीन व दुध डेअरीची मशिनरी अशी गहाण ठेवली होती व बँकेकडून 3 कोटी 73 लाख रूपयांचे कर्ज घेतले.

हे कर्ज अद्यापपावेतो फेडलेले नाही. सन 2013 मध्ये हे कर्ज त्यांनी घेतले होते. बँकेने कर्ज फेडण्याचा तगादा लावल्यावर ती मशिनरी चोरीला गेल्याचे संचालकांनी सांगितले.

याप्रकरणी देना बँकेचे साक्री शाखेचे अधिकारी के.आर.पाटील यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन हिरालाल गोसावी, योगेश हिरालाल गोसावी, प्रमिला हिरालाल गोसावी, मधुकर गोपाजी गावीत, विजू गावीत सर्व रा.साक्री यांच्याविरूध्द भादंवि 420, 120 ब, 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*