366 पोलिसांंच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या

0

धुळे / जिल्हा पोलिस अधिक्षक एम. रामकुमार यांनी 12 वर्ष शहरात ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या शहराबाहेर पोलिस ठाण्यांमध्ये बदली करण्यात आली आहे.

तर एकाच पोलिस ठाण्यात पाच वर्ष सेवा बजविलेल्या कर्मचार्‍याचीही इतरत्र बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यांतर्गत 366 कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधिक्षकांनी केल्या आहेत. तर वादग्रस्त 17 कर्मचार्‍यांची मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, पोलिस नाईक, शिपाई यांच्या बदल्या मे महिन्यात करण्यात येतात. काल रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास बदल्यांचे आदेश एम. रामकुमार यांनी दिलेत.

यात 308 कर्मचार्‍यांची प्रशासकीय कारणास्तव, 14 जणांची विनंतीवरुन तर तैनात असलेल्या 44 कर्मचारी अशा एकूण 366 कर्मचार्‍यांची जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. त्यात पोलिस अधिक्षक, अपर पोलिस अधिक्षक व गृह विभागाचे पोलिस अधिक्षक यांचा समावेश होता.गेल्या 12 वर्षापेक्षा अधिक काळ शहरातच ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या शहराबाहेरील तालुक्याच्या पोलिस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.

तीन सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
राज्यातील 175 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात जिल्ह्यातील तीन अधिकार्‍यांचा समावेश आहे. शिरपूर तालुका पोलिसठाण्याचे रवींद्र देशमुख यांची नासिक शहरात, शिंदखेडा पोलिस ठाण्याचे संदीप गोंडाणे यांची लोहमार्ग नागपूर आणि दोंडाईचा पोलिस ठाण्याचे संतोष इंगळे यांची अमरावती परिक्षेत्र येथे विनंती बदली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*