प्रवासी उत्पन्न वाढविल्याने धुळे विभाग राज्यात प्रथम

0
धुळे / धुळे विभागाने प्रवासी उत्पन्न दि.1 ते 22 मे दरम्यान तीन कोटी 47 लाख वाढविल्यामुळे धुळे विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे असे पत्र व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंग देवले यांनी विभाग नियंत्रक आर.ए.देवरे यांना आज पाठविले आहे.
परिवहन महामंडळात मे महिन्यात प्रवाशांची प्रवासासाठी गर्दी असते. या गर्दीत योग्य नियोजन करुन बसेस पाठविल्या जातात. असेच नियोजन विभाग नियंत्रक आर.ए.देवरे यांनी करुन प्रवाशांना दर्जेदार सेवा दिली.
त्यामुळे दि.1 ते 22 मेदरम्यान प्रवासी उत्पन्न वाढविण्यास धुळे विभागाला यश आले आहे. धुळे विभागाने या काळात तीन कोटी 47 लाखांचा महसूल मिळवून दिला आहे.

मागील वर्षी याच काळात 40 कोटी 72 लाख महसूल मिळाला होता. यंदा मात्र त्यात वाढ झाली असून 43 कोटी 97 लाख महसूल मिळाला आहे.

मागील वर्षी 64 लाख 25 हजार किलोमीटर बसेस धावल्या. तर यंदा 68 लाख दहा हजार बसेस धावल्या आहेत. धुळे विभागाने 22 दिवसात प्रवासी उत्पन्न वाढवून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

जूनअखेर धुळे विभागाला सात कोटींचे उद्दिष्ट्य मध्यवर्ती कार्यालयाने दिले आहे. ते साध्य करण्यासाठी धुळे विभाग प्रयत्नशील आहे.

LEAVE A REPLY

*