चिंचवारला धुमश्चक्री : आठ जण जखमी

0
धुळे / चिंचवार, ता.धुळे येथे लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना धक्का लागण्याच्या कारणावरुन धुमश्चक्री उडाली.
या धुमश्चक्रीत काठ्या, लोखंडी सळई, दगड-विटा यांचा सर्रास वापर करण्यात आला. या मारहाणीत आठ जण जखमी झाले. या प्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात 32 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, चिंचवार, ता.धुळे येथे राहणारे किशोर भगवान मासुळे (वय 26) यांचा धनराज हेमंत कोळीसह 13 जणांशी लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरुन दि.22 मे रोजी सकाळी आठ वाजता वाद झाला.

या वादातून धनराज पाटीलसह 13 जण एकत्रित येवून किशोर यांना डोक्यावर काठी व सळईने मारहाण केली तसेच दगड, विटा फेकल्या.

राकेश रघुनाथ मासुळे याने डोक्यात लोखंडी सळई मारुन गंभीर जखमी केले. तर कारभारी हिरामण यांना बंटी दिलीप मासुळे, कल्पेश श्रीपत मासुळे यांनी लोखंडी सळईने मारुन जखमी केले.

हिरालाल बाबुलाल बागूल यांना सुकदेव आप्पा मासुळे, शिवाजी आप्पा मासुळे यांनी डोक्यावर काठी व विटांनी मारहाण केली. सखाराम बाबुलाल बागूल यांना हिलाल आप्पा मासुळे, देवा रंगमल मासुळे व त्यांचा मुलगा यांनी काठीने मारहाण केली.

तसेच शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत किशोर भगवान मासुळे (वय 26), शिवाजी आप्पा मासुळे (वय 40), सागर देविदास मासुळे (वय 17) हे तीन जण जखमी झाले.

याबाबत किशोर भगवान मासुळे यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 307, 147, 148, 149, 504 प्रमाणे धनराज हिरामण पाटील, भुरा शांताराम पाटील, भगवान हिरामण पाटील, सखाराम बाबुलाल पाटील, सोमनाथ हिरामण पाटील, कारभारी हिरामण पाटील, सोमनाथ हिरामण पाटील यांचा भाचा योगेश विठ्ठल पाटील, बापू उखा पाटील, दासभाऊ उखा पाटील, संदीप बापू पाटील, ज्ञानेश्वर बापू पाटील, विलास तुळशिराम पाटील, विलास जगन्नाथ पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

तर संजय हिरामण बागूल यांनी परस्पर तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे की, साहेबराव संजय महालेसह 19 जणांनी गर्दी करुन संजय यांना राकेश रघुनाथ मासुळे याने डोक्यावर सळईने मारुन जखमी केले.

कारभारी हिरामण यांना बंटी दिलीप मासुळे, कल्पेश श्रीपत मासुळे यांनी लोखंडी सळई डोक्यावर मारुन जखमी केले. हिरामण बाबुलाल बागूल यांना सुकदेव आप्पा मासुळे, शिवाजी आप्पा मासुळे यांनी डोक्यावर काठी व विटांनी मारहाण केली.

तसेच शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत संजय हिरामण बागूल, कारभारी हिरामण बागूल, हिरालाल बाबुलाल बागूल, सखाराम बाबुलाल बागूल, धनराज हिरालाल बागूल हे जखमी झाले. त्यांच्या तक्रारीवरुन भादंवि 307, 147, 148, 149, 504 प्रमाणे साहेबराव संजय मासुळे, शालीक रतन मासुळे, हिलाल आप्पा मासुळे, राकेश रघुनाथ मासुळे, यशवंत रघुनाथ मासुळे, श्रीपत अण्णा मासुळे, सुकदेव आप्पा मासुळे, दगा रगमल मासुळे, पोपट यादव मासुळे, भगवान यादव मासुळे, कल्पेश श्रीपत मासुळे, बंटी दिलीप मासुळे, रुपेश श्रीपत मासुळे, नितीन जिभाऊ मासुळे, शिवाजी आप्पा मासुळे, देवा रंगमल मासुळे, देवा रंगमल यांचा मुलगा, भाऊसाहेब दिलीप मासुळे आणि दीपक दगा मासुळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

बसचालकाला मारहाण – शहरातील बारापत्थर चौकात मोटारसायकल बसला आडवी लावून चालकाला शिवीगाळ करुन स्टेअरिंगवरुन खाली ओढून ठार मारण्याची धमकी दिली व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मोटारसायकल चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, परिवहन बस (क्र.एमएच 40 एन 9076) ही भुषण फकिरा बोईनीस हे दि.22 मे रोजी शहरातील बारापत्थर चौकातून बस नेत असताना बससमोर एमएच 19 सीबी 7393 क्रमांकाची मोटारसायकल आडवी लावून बसचालकाला शिवीगाळ करुन स्टेअरिंगवरुन खाली ओढताण करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात भूषण फकिरा बोईनीस यांनी फिर्याद दिली. भादंवि 353, 323, 504, 506 प्रमाणे मोटारसायकल चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात ठार – शहादा येथून नाशिककडे स्वीप्ट डिझायर गाडीने (क्र.एमएच 15 ईबी 2810) ने जात असताना मुंबई-आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाने कारला हुलकावणी दिल्याने कार दुभाजकावर धडकल्याने त्यात राधा बाळकृष्ण वडनेरे (वय 53), रा.ओझर ही ठार झाली. याबाबत बाळकृष्ण विठ्ठल वडनेरे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 304 (अ), 279, 337, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 184, 134, 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

चारित्र्याचा संशय – खापरखेडा, ता.शिंदखेडा येथे राहणारी सौ.सुमनबाई नाना पवार या विवाहितेने पतीच्या नोकरीसाठी माहेरुन एक लाख रुपये आणले नाहीत तसेच तिच्या चारित्र्याचा संशय घेवून तिच्या पतीसह नऊ जणांनी छळ करुन मारहाण केली, अशी फिर्याद सौ.सुमनबाई नाना पवार यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात दिली. भादंवि 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे विवाहितेचा पती नाना उत्तम पवार, सासरे उत्तम रामदास पवार, सासू कमलबाई उत्तम पवार, जेठ संजय उत्तम पवार, नणंद जिजाबाई उत्तम पवार, चुलत दीर किरण बापू पवार, किशोर धारसिंग पवार, विजू धारसिंग पवार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

मोटारसायकल चोरी – शहरातील राऊळवाडीत राहणारा नीलेश चंद्रकांत नेमाने याने त्याच्या मालकीची 40 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल (क्र.एमएच एए 2208) ही दि.18 मे रोजी रात्री आठ ते दि.19 मे च्या सकाळी सात वाजेदरम्यान घराच्या अंगणात लावलेली होती. अज्ञात चोरट्याने सदर मोटारसायकल चोरुन नेली, अशी फिर्याद नीलेश नेमाणे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

वृध्दाची आत्महत्या – शिरपूर शहरातील कन्या हायस्कूलजवळ राहणारा पंडीत तुळशिराम माळी (वय 60) याने दि.22 मे रोजी पहाटे 4.30 वाजता आजारपणाला कंटाळून राहत्याघरी मागील खोलीमध्ये लाकडी दांडीला ओढणी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत शिरपूर शहर पोलिस ठाण्यात कैलास पंडीत माळी यांनी माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तळावपाडा, ता.शिरपूर शिवारातील शेतात संपत दाडू पावरा (वय 55), रा. अजगवाणी याने शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत जुगीराम पावरा यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात माहिती दिली. यावरुन अकस्मात मृत्यूची माहिती दिली.

LEAVE A REPLY

*