आयुक्तांकडून कारवाईचा बडगा

0

धुळे / कामांची जबाबदारी सोपविलेली असतांना हलगर्जीपणा व कामात कुचराई केल्यामुळे आयुक्त संगीता धायगुडे यांनी चार अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

इतर काही अधिकारी व कर्मचार्‍यांना कारणे द्यावा नोटीस, इतर अनुपस्थितीत, रजा मंजूर नसतांना रजेवर जाणे अशा विविध कारणांमुळे संबंधितांना नोटीसांसह दंड थोटावण्यात आला आहे.

महासभेत शहरातील पाणीपुरवठा व अस्वच्छता हे प्रश्न महासभेत गाजला होता. प्रशासनाला सभागृहाने धारेवर धरले होते. हे केवळ हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केल्यामुळे होत असल्याचा ठपका आयुक्तांनी ठेवला.

पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कैलास शिंदे, कनिष्ठ अभियंता सी.एम. उगले, सी.सी.बागूल, एस.बी. विसपुते, हेमंत पावटे यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये दंड थोटावण्यात आला तर सहाय्यक आयुक्त अभिजित कदम, प्रभारी नगररचनाकार पी.डी.चव्हाण, अतिक्रमण निर्मुलन अधिकारी नंदु बैसाणे यांना प्रत्येकी पाच हजार तर सहाय्यक आरोग्य अधिकारी रत्नाकर माळी यांना सात हजार दंड थोटावण्यात आला.

त्या-त्या विभागातील अधिकार्‍यांना त्या विभागाशी संबंधित कामात कुचराई केल्याने दंड थोटावण्यात आला आहे. कदम यांना मालमत्ता कराची देयके वाटप न करणे, चव्हाण यांना अधिकृत बांधकामांवर कारवाई, माळी यांना कामात हलगर्जीपणा, बैसाणे यांना अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणाबाबत नियमानुसार कारवाई न केल्याने दंड करण्यात आला आहे.

सहाय्यक आयुक्त त्र्यंबक कापडे यांना रजा मंजूर नसतांना रजेवर गेल्याने रजेच्या कालावधीतील त्यांचे वेतन कपातीचा आदेश देण्यात आला आहे.

झाडाझडती सुरु- आयुक्त संगीता धायगुडे यांनी सहाय्यक आयुक्त अनुप डुरे यांना विभागप्रमुख व कर्मचार्‍यांची अचानक पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यामुळे डुरे यांनी झाडाझडती घेण्याचे काम सुरु केले आहे. यावेळी काही कर्मचारी कार्यालयीन कामाच्या वेळी जागेवर नसणे, रजेचा अर्ज नसतांना रजेवर जाणे, रजा मंजूर नसतांना रजेवर जाणे, आदी कारणांनी अनुपस्थित असल्याचे आढळून आले.

LEAVE A REPLY

*