उपाययोजनांसाठी सज्ज रहा !

0
धुळे / पावसाळ्यात काही आपत्तकालिन स्थिती निर्माण होते. या स्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात.
कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल अशी तंबीही आयुक्तांनी यावेळी दिली.
पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीसंदर्भात आयुक्तांनी काल अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठक घेतली.

महापौर सौ. कल्पना महाले यांनी यापुर्वीच या संदर्भात बैठक घेतली होती. त्यानंतर कामात सुधारणा होत नसल्यामुळे काल आयुक्तांनी बैठक घेतली.

पावसाळ्यात नाले, गटारी तुंबण्याचे प्रकार होतात. अतिवृष्टी झाल्यास आपत्ती उभी राहते ती आपत्ती टाळण्यासाठी नाले व गटारींची सफाई पुर्ण करा, पावसाळ्यापुर्वी रस्त्यावरील खड्डे बुजण्यात यावेत. साथ रोग टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.

केवळ कागदावरच सफाई न दाखविता प्रत्यक्षात कृती करा अन्यथा कामात हलगर्जीपणा केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी तंबी आयुक्त संगीता धायगुडे यांनी बैठकीत दिली.

LEAVE A REPLY

*