‘धूम’ टोळीने विद्यार्थ्याचा मोबाईल पळविला : गुन्हा दाखल

0
धुळे / शहरातील रेल्वे गेटजवळील रोडवरुन मोटार सायकलीवर भरधाव वेगाने आलेल्या व्यक्तीने विद्यार्थ्यास धक्का देवून त्याच्या हातातील दहा हजार 999 रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून नेला याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील मोहाडी उपनगरात राहणारा फिरोज जहाबाज तडवी (वय23) हा विद्यार्थी रेल्वे गेटजवळील रोडने पायी जात असतांना मोटार सायकलीवर आलेल्या दोघांपैकी एकाने फिरोज यांना धक्का मारुन त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिरोज जहाबाज तडवी यांनी फिर्याद दिली. भादंवि 392, 34 प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

मोटार सायकल चोरी- शिरपूर शहरातील साई अपार्टमेंटमध्ये राहणारे कल्पेश संजय गावडे यांनी त्यांच्या मालकीची दहा हजार रुपये किंमतीची एमएच 15 ईटी 5738 क्रमांकाची मोटार सायकली घरासमोर लावलेली होती. अज्ञात चोरट्याने सदर मोटार सायकल चोरुन नेली. याबाबत शिरपूर शहर पोलिस ठाण्यात कल्पेश संजय गावडे यांनी फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाहितेचा छळ- महिंदळे येथे राहणारी सोनल भाऊसाहेब उर्फ तुषार प्रभाकर कुंभार या विवाहितेने माहेरुन दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून तिचा छळ करण्यात आला. या प्रकरणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

तिरंगा चौकात राडा-धुळे शहरातील तिरंगा चौकात राहणारे खालीक अहमद शाह (वय19) यांच्याशी मागील लग्नात झालेल्या भांडणावरुन इजाज साबीर शाह याने वाद घातला या वादातून इजाजसह नऊ जणांनी दगडफेक करुन खालीकला हाताबुक्क्यांनी व काठीने मारहाण करुन जखमी केले. याबाबत आझादनगर पोलिस ठाण्यात खालीक अहमद शाह यांनी फिर्याद दिली. भादंवि 143, 147, 148, 149, 324, 336 प्रमाणे इजाज सादीक शाह, शाहरुख इस्माईल शाह, इम्रान हमीद अन्सारी, आसिफ मुल्ला, भोलू शाह, शाबीर शाह, रमजान शाह, नईम अन्सारी उर्फ बोक्या, हमीद आण्णा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला तर शाहरुख इस्माईल शाह यांनी परस्पर तक्रार दिली असून खालीक अहमद शाहसह दहा जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हाताबुक्क्यांनी काठीने मारहाण केली. त्यात जखमी झाले त्यांच्या तक्रारीवरुन भादंवि 143, 147, 148, 149, 324, 336 प्रमाणे खालीक अहमद शाह, फराज सादीक पठाण, निहाल अहमद अब्दुल रहमान अन्सारी, कलिम शेर अबीद शेख, शेखा पेंटर, जहीर शेख पेंटर, जुबेर शेख नरुद्दीन शेख उर्फ पेंटर, अबुलाल कालिया, रोशन हाजी, डॉन रिक्षावाला यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

साक्रीत दोन गटात वाद-ग्रानी सेंटर एनर्जीमध्ये काम करणारे इंजिनिअर राहतात त्यांच्याशी पाटेकर यांच्या सहकार्याशी कामासंबंधी त्यांच्याबद्दल पाटेकर यांनी केलेल्या चर्चेबाबत सुमित ज्ञानेश्वर भामरे याने वाद घालून योगेश गजानन भामरे यांच्या कपाळावर काहीतरी जाड वस्तूने मारुन जखमी केले तर दोघांनी हाताबुक्क्यांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत योगेश गजानन भामरे यांनी साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे सुमित ज्ञानेश्वर भामरे, पप्पू ज्ञानेश्वर भामरे, युवराज मराठे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला तर सुमित ज्ञानेश्वर भामरे यांनी परस्पर तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरुन भादंवि 323, 504, 506, 34 प्रमाणे डॉ. देवेंद्र लोटनराव देवरे, योगेश गजानन भामरे, शैलेश भगवान अजने, स्वप्नील भावसार यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*