एटीएम सेवा 24 तास बंद

0
विरदेल/ शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत ग्राहकांना सुविधा मिळत नसल्याने गावात नाराजी व्यक्त होत आहे.
सेंट्रल बँक शाखा विरदेल येथे संबंधित खातेदार व ग्राहकांची संख्या पंधरा हजारांवर असून परिसरातील बरेच शेतकरी व मजूर वर्ग नोकरदारांचे सेंट्रल बँकेत व्यवहार होत असतात.

परंतु ऐनवेळेस ग्राहकाला लागणारी 50 ते 60 हजाराची रक्कम देखील मिळत नसल्याने रोकड व्यवहार करणार्‍यांना अडचण निर्माण झाली आहे.

नेहमीप्रमाणे चलन तुटवडा ह्या बँकेत होत असल्याने थोड्याफार प्रमाणात रोकड व्यवहार करणारे ग्राहकदेखील हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे.

दुसर्‍या नॅशनल बँकेची तरी पर्यायी सुविधा मिळेल काय ह्याबद्दल ग्राहकाकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

*