झोपडपट्टी धारकांना ओळखपत्र द्या !

0
धुळे / तत्कालीन मनपाचे आयुक्त दिलीप पायगुडे यांनी शहरातील घोषित झोपडपट्टी धारकांना ओळखपत्र दिले होते.
मात्र सदर ओळखपत्र गहाळ झाले असून झोपडपट्टीधारकांना तात्काळ ओळखपत्र द्यावे, अशी मागणी वसीम अत्तार, रमजान पिंजारी, सु.नु.पिंजारी, नरेंद्र चौधरी आदींनी मनपा आयुक्त संगिता धायगुडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

शासन निर्णयानुसार झोपडी व झोपडपट्टी संरक्षण पात्र ठरविण्याबाबत निकष ठरविले आहेत. त्यानुसार झोपडपट्टी वासियांच्या नावासह झोपडी क्रमांकाचा उल्लेख असलेले वीज कंपनीची जोडणी दिल्याची कागदपत्रे किंवा नगरपालिकेने मालमत्ता आकारणी केल्याचा पुरावा आहे.

त्या नुसार रमाबाई आंबेडकरनगर झोपडपट्टीवासी संरक्षित म्हणून घोषित व्हावी व सर्व झोपडपट्टी धारकांना झोपडपट्टी ओळखपत्र देण्यात यावे असे मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

*