सत्कार्योत्तेजक सभेचा रौप्य महोत्सव

0
धुळे / शहरातील सत्कार्योत्तेजक समितीची स्थापना 1993 रोजी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने करण्यात आली होती. या संस्थेला 125 वर्ष पुर्ण झाल्याने शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. चितळे म्हणाले की, शहरात 125 वर्षापासून विविध क्षेत्रात सत्कार्योत्तेजक सभेने उल्लेखनीय काम केले आहे.

या सभेंतर्गत समर्थ वाग्देवता मंदीर तसेच विविध संस्था कार्यरत आहेत. 125 व्या महोत्सवानिमित्त दि. 29 मे 2017 ते 28 मे 2018 या एकवर्षाच्या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

29 मे रोजी होणार्‍या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. विवेकानंद चितळे यांच्या हस्ते होणार आहे. तर दि. 2, 3, 4 जून रोजी सायंकाळी 5.30 ते 7 या वेळेत डॉ. मुकुंदराज महाराज सोनगीरकर यांचे प्रवचन समर्थ वाग्देवता मंदीर रामवाडी येथे आयोजीत करण्यात आले आहे.

तर दि.18 जून रोजी अविनाश धर्माधिकारी पुणे यांचे जेष्ठ नागरीक संघ धुळे येथे प्रवचन होणार आहे. त्याचप्रमाणे चारुदत्त आफळे, वृंदाताई निफाडकर, भाऊ महाराज रुद्र यांचे किर्तन होणार आहे.

नोव्हेबर,डिसेबर,जानेवारी 2018फेब्रुवारी,एप्रिल या कालाधीत सत्कार्योत्तेजक सभेच्या रौप्य महोत्सवानिमीत्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*