सोनगीरजवळ दोन अपघातात तीन ठार

0
सोनगीर / मुंबई-आग्रा महामार्गावर आज (ता. 19) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वृध्द महिलांसह एका तरुणाचा समावेश आहे.
आज पहाटे एक वाजेच्या सुमारास हरेश्वर गुलाबराव देवरे (वय 28, रा. पिंपरखेडा ता. शिंदखेडा) हा सोनगीरहून पिंपरखेड्याला मोटारसायकलने (क्र. एमएच 18, एटी 0823) जात होता.
त्यावेळी जूना बाभळे रस्त्यावरून महामार्गाकडे समोरून येणार्‍या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यात हरेश्वर जागीच ठार झाला.

दोन महिलांचा मृत्यू
त्याचप्रमाणे दुसर्‍या एका अपघातात दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भागाबाई आखाडू भील (वय 65) व इंदूबाई तुळशीराम भिल (वय 62) भील रा. सोनगिर या दोघी गवत काढण्यासाठी जात होत्या. पहाटे चार वाजेच्या सुमारास येथून एक किलोमीटर अंतरावर महामार्गाच्या कडेने सरवडकडे जात असताना मागून येणार्‍या ट्रकने (क्र. एमपी 09, एचएच 861) महामार्गावरील लोखंडी कठडे तोडत ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात भागाबाई व इंदूबाईचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला. या अपघाताची खबर शिवा रामदास भील यांनी पोलीसात दिली. दोन्ही मृतांवर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन डॉ. किरणकुमार निकवाडे यांनी केले. त्यांच्यावर दुपारी बारा वाजेच्या च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

*