शेतकर्‍यांच्या वाहनाला अपघात

0
धुळे / नाशिक येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या शेतकरी कर्जमुक्ति मेळाव्यासाठी जाणार्‍या स्कार्पियो गाडीस धुळे- नाशिक महामार्गावर अपघात झाला.
यात तालुक्यातील अजंग गावाचे 8 शेतकरी बांधव जखमी झाले. त्यातील चारजण गंभीर आहेत. आज दि.19 रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास वाहनावरिल ताबा सुटल्याने चिखलहोळ येथे हा अपघात घडला.
यावेळी स्कार्पीओ गाडीने तब्बल चार वेळा पलटी खाल्ली. यातील जखमींवर धुळे येथील निरामय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.
नाशिक येथे शिवसेनेर्फे कृषी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी अजंग येथून आठ शेतकरी एम.एच.19 ए.एक्स. 5556 या क्रमांकाच्या स्कर्पीओने नाशिककडे जात होते.

झोडग्याजवळ असलेल्या चिखलहोळ गावाजवळ स्कार्पीओला अपघात झाला. यामध्ये मनोहर सुरेश माळी, श्रीराम चिंतामन माळी, अर्जुन जयराम माळी, हरिचंद्र सुरेश माळी हे चौघे गंभीर जखमी झाले आहे.

तर ज्ञानेश्वर धुडकू माळी, रघुनाथ भिका माळी, राजु माणिक वडार आणि दिनेश नामदेव माळी यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी तत्काळ धुळे येथे डॉ. विपुल बाफना ह्यांच्याशी संपर्क केला. सर्व अपघातग्रस्त रुग्णांना निरामय हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.

निरामय हॉस्पिटल येथे सर्व 8 रुग्णांवर तातडीने मोफत उपचार सुरु झाले. 3 रुग्णांना डोक्याला मार लागलेला असून त्यांचे सी.टी. स्कॅन करण्यात आले. इतर 3 रुग्णांना फॅ्रक्चर असून त्यांच्यावर अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.हर्षद सोनवणे, पाटील उपचार करत आहेत.

सर्व शेतकरी बांधवांवर शस्त्रक्रिया व उपचार निरामय हॉस्पिटल येथे मोफत करण्यात येत आहेत. सर्व शेतकरी बांधवांची प्रकृती स्थिर असून शिव आरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्षा व सहसंपर्क प्रमुख डॉ.माधुरी बोरसे यांनी परदेशांतुन निरामय हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष संपर्क करुन आस्तेवाईकपणे विचारपुस केली.

LEAVE A REPLY

*