कृषी विद्यापीठ धुळ्यातच होण्यासाठी प्रयत्नशिल – मुख्यमंत्री

0
धुळे / नियोजित कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यातच स्थापन करण्यासाठी शासनाने नेमलेल्या डॉ.एस.वाय.पी.थोरात व डॉ.व्यंकेटेश्वरलू समितीच्या अहवालाची काटेकोर अंमलबाजवणी करण्यात येईल, अशा प्रकारचे सुतोवाच
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यात केले.
विद्यापीठ निर्माण कृती समितीचे निमंत्रक प्रा.शरद पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी
मुख्यमंत्र्यांची गुलमोहर शासकीय विश्रामगृहात भेट घेवून निवेदन सादर केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

राज्यातील दोन कृषी विद्यापीठांचे विभाजन करुन नवीन विद्यापीठे निर्माण करण्यासाठी मा.देवेंद्र फडणवीस सरकारने कुलगुरु डॉ.व्यंकटेश्वरलू यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय समिती नेमली होती.

या समितीचा अहवाल शासनाला जानेवारी 2016 या महिन्यात सादर झाला आहे. ज्या ठिकाणी कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी पूरक वातावरण आहे, अशाच ठिकाणी विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे, असा निष्कर्ष या समितीने आपल्या अहवालात दिला आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात विद्यापीठ स्थापनेच्या अनुकुलतेचे सर्व मुद्दे मांडण्यात आले. काल मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे वेळ देवून निवेदन स्विकारले.

 

LEAVE A REPLY

*