सत्यपाल महाराज, श्रीमंत कोकाटेंवरील हल्ल्याचा निषेध

0
धुळे / पुरोगामी विचारांचा प्रचार-प्रसार करणारे किर्तनकार सत्यपाल महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास उजेडात आणण्यासाठी झटणारे श्रीमंत कोकाटे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला.
या घटनेचा संभाजी ब्रिगेडतर्फे निषेध करण्यात आला आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या विषयी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांची काही महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. त्यानंतरही पुरोगामी विचारांचा प्रचार-प्रचार करणार्‍यांवर हल्ले सुरूच आहेत.

दोन दिवसांपूर्वी मुंबईत सत्यपाल महाराज श्रीमंत कोकाटेंवर हल्ला झाला. पुरुषोत्तम खेडेकर, न्यायमूर्ती कोळसे पाटील, गंगाधर बनबरे, आ. ह. साळुंखे, अमोल मिटकरी यांच्यावरही हल्ला होऊ शकतो.

 

LEAVE A REPLY

*