कांदयांने शेतकर्‍याने रडविले !

0
बळसाणे / बळसाणेसह परिसरातील शेतकर्‍यांनी कांदा साठविण्याची लगबग सुरु केली आहे. गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत कांदा पिक काढले.
मात्र बळीराजाला आजच्या भावात खर्चदेखील निघत नसल्यामुळे बळसाणेसह परिसरातील कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे.
वर्षभर सर्वच पिकांमधून तोटा सहन करावा लागल्याने आर्थिक व मानसिक त्रास सहन करणार्‍या बळिराजाच्या मनाला थोडासा आधार देण्यासाठी शेतकर्‍यांचीच मुले पुढे सरसावल्याचे सोशल मीडियावर फिरणार्‍या संदेशावरून दिसत आहेत.
शेतकर्‍यांच्या भावना व मेहनतीची कदर करणारे संदेश सोशल मीडियावर रोजचे चित्र पहावयास मिळत आहेत. कधी सरकारच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणार्‍या कांद्याने दुष्काळाशी दोन हात करणार्‍या बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले.

कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकर्‍यांचे उत्पादन खर्च ही फिटत नसल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. सततच्या दुष्काळाने होरपळून निघणार्‍या कष्टकरी शेतकरी वर्गाला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.

कधी बदलणार्‍या हवामानाशी दोन हात करून ही बाजारात मिळणार्‍या मातीमोल भावामुळे शेतकर्‍यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होण्याचे नाव घेत नाही.

चालू वर्षाच्या खरीप हंगामात खराब हवामानामुळे वाया गेला होता. तर रब्बीत बदलत्या हवामाना बरोबरच बाजारात सध्या मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे उत्पादन खर्च ही फिटत नसल्यामुळे बळसाणे सह परिसराचा शेतकरी पुर्णतः आर्थिक व मानसिक विंवेचनेत सापडला आहे सध्या तरी कांदा शेतातच पडला आहे.

LEAVE A REPLY

*