उष्माघाताने बोरकुंड येथे शेतकर्‍याचा मृत्यू

0
धुळे / बोरकुंड, ता. धुळे येेथे उष्माघाताने 50 वर्षीय शेतकर्‍याचा मृत्यू झाला आहे.
बोरकुंड येथे राहणारे वाल्मिक हसनराव पवार (वय50) हे शेतकरी दि. 14 मे रोजी स्वत:च्या शेतात नेहमीप्रमाणे शेती कामासाठी गेले होते.
ते उन्हात शेतात काम करीत होते.त्यामुळे त्यांना दुपारी उन्हाचा त्रास जाणवू लागला.
ते अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी बोरकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले परंतू पवार यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे उपचार घेत असतांना आज दि. 18 मे रोजी पहाटे वाल्मिक पवार यांचा मृत्यू झाला.

शेतकर्‍याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे बोरकुंड गावावर शोककळा पसरली. राष्ट्रवादी काँग्रेस ब्लॉक कमिटीचे सरचिटणीस बंडू पवार यांचे ते बंधू तर समाधान पवार यांचे वडील होत.
तापमानाचा पारा 43 अंशावर
धुळे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच सूर्य आग ओकू लागला होता. या महिन्यातच तापमानाने चाळीशी ओलांडली होती. मार्च महिन्यात देखील तशीच स्थिती होती. एप्रिल महिन्यातच मे हिटचा तडाखा नागरिकांनी अनुभवला. मे महिन्यात 42 ते 44 अंश तापमान राहिले आहे. आज दि. 18 मे रोजी तापमानाचा पारा 43 अंशावर स्थिरावला असल्याची नोेंद कृषि महाविद्यालयात करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे अनेकांना उन्हाचा त्रास जाणवत आहे. उलट्या व शौचाचा त्रास होत आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र आणि सर्वोपचार रुग्णालयात उष्माघाताचा कक्ष सुरु करण्यात आलेला आहे. पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*