ओमप्रकाश देशमुख यांची बदली

0
धुळे / येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांची बदली झाली असून त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी तथा कळवणचे गंगाथरण डी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
23 जानेवारी 2015 रोजी ओमप्रकाश देशमुख यांनी धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सुत्रे हाती घेतली होती. सव्वादोन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक चांगले उपक्रम राबविले.
विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळा डिजीटल करुन जिल्ह्यात डिजीटल क्रांती केली. याची दखल राज्यस्तरावर घेण्यात येवून राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी जिल्हा प्रशासनाचे खास कौतुक केले होते.

पाणी टंचाईच्या प्रश्नावर ओमप्रकाश देशमुख संवेदनशील असायचे. उन्हाळ्यात तालुका स्तरावर जावून बैठकांद्वारे नियोजन आखत असत.

देशमुख यांच्या बदलीच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री फडणवीस जिल्ह्यात येवून गेले. साळवे ता.शिंदखेडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या डिजीटल वर्गाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.

यावेळी ओमप्रकाश देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसमोर डिजीटल शैक्षणिक क्रांतीची माहिती दिली. त्याचप्रमाणे शिंदखेडा येथील आढावा बैठकीत जलयुक्त शिवार व हागणदारीमुक्त योजनांविषयी देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसमोर माहिती सादर केली.
‘देशदूत’ची ग्रामविकास परिषद स्मरणात राहील
दै.देशदूतने काही दिवसांपूर्वी ग्रामविकास परिषद घेतली होती. या परिषदेला जिल्हा परिषदेचे सहकार्य लाभले होते. तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकारी त्या परिषदेच्या निमित्ताने एकत्र आल्याचे प्रथमच अनुभवले होते.भास्करराव पेरेपाटील यांनी स्वच्छता विषयाबाबत विनोदी शैलीतून केलेले प्रबोधन आणि मंत्री महोदयांसह जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांनी केलेले मार्गदर्शन यामुळे या परिषदेचा ग्रामपातळीवर काम करणार्‍या घटकांना उपयोग झाला. अशाप्रकारे आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली होती. त्यामुळे देशदूतची ग्रामविकास परिषद कायम स्मरणात राहील, असेही ओमप्रकाश देशमुख म्हणाले.

LEAVE A REPLY

*