शेतीपूरक व्यवसायासाठी शिरपूर येथे 21 मे रोजी प्रशिक्षण

0
शिरपूर / शेती व्यवसायासोबतच शेतीपूरक व्यवसाय यशस्वीरीत्या करण्यासाठीदि. 21 मे रोजी शिरपूर येथे शेतकरी बांधवांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन माजी शिक्षणमंत्री आ. अमरिशभाई पटेल व प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी केले आहे.

शिरपूर येथील आर.सी.पटेल फार्मसी कॉलेज कॅम्पसमधील एस.एम.पटेल ऑडीटोरीअम हॉल येथे सकाळी 9 तेसायंकाळी 5 वाजेपर्यंत बंदिस्त् शेळीपालन, कुक्कुटपालन, सेंद्रीय शेती व आंतरपिकांमधील प्रचंड श्रीमंती याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

यासाठी भुपेशभाई पटेल फ्रेंड सर्कल यांचे सहकार्य लाभले आहे. अधिक माहितीसाठी सुभाष कुलकर्णी राजेंद्र पाटील गढी, शिरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन, भैरव राजपूत यांच्याशी संपर्क साधावा. शिरपूर शहरातील काँग्रेस भवन येथे सकाळी 8 ते दुपारी 12 व दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत नावनोंदणी करण्यात येत आहे.

सुवर्ण कोकण-सामर्थ्य महाराष्ट्राचे या चळवळीचे तज्ज्ञ मार्गदर्शक व घाटकोपर मुंबई येथील सुवर्ण कोकण फाऊंडेशनचे प्रमुख सतिष परब व त्यांच्या तज्ज्ञ सहकारी मंडळीचे शेतकरी बांधवांना विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

माजी शिक्षणमंत्री आ.अमरिशभाई पटेल तसेच आ.काशिराम पावरा व प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी शेतकरी बांधवांसाठी शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन, माती परीक्षण व मार्गदर्शनपर विविध कार्यक्रम अविरतपणे सुरु आहेत.

उपस्थितीचे आवाहन प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*