शिरपूरमधील क्रिकेट खेळाडूंना आयपीएल सामना पाहण्याची संधी

0
शिरपूर / शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीतून शिरपूरचे खेळाडू अतिशय चांगल्यारीतीने घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
त्यांच्यात आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी शिरपूरचे खेळाडू व प्रशिक्षक असे एकूण 30 जणांना आयपीएलचे सामने मुंबई येथे पाहण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली.

सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांना भुपेशभाई पटेल यांनी सर्व खर्च करुन मुंबई येथील वानखेडे स्टेडीअम येथे मुंबई व पुणे यांच्यातील दि. 16 मे रोजीचा सामना पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिली.

याबाबत शिरपूर तालुक्यासह इतरत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.

 

LEAVE A REPLY

*