सलाईपाडा धरणाच्या कामासाठी प्रयत्न करणार !

0
शिरपूर / आ. काशिराम पावरा यांनी तालुक्यातील बोराडी परिसरातील कार्यकर्त्यांसह वनविभागाचे अधिकारी यांना सोबत घेवून सलाईपाडा धरणाची पाहणी केली.
सलाईपाडा धरणाचे काम मार्गी लावण्यासाठी माजी शिक्षणमंत्री आ. अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरु असल्याचे आ.काशिराम पावरा यांनी सांगितले.

सलाईपाडा धरणाच्या कामासाठी पाठपुरावा केले जाईल असे सांगून परिसरातील विकासासाठी माजी शिक्षणमंत्री आ. अमरिशभाई पटेल व प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्यासह प्रयत्न सुरु आहेत.

अजून लक्ष घालून जोमाने कामे केली जातील असे यावेळी आ.काशिराम पावरा यांनी कार्यकर्त्यांशी बोलतांना सांगितले. वनविभागाच्या अधिकारी यांना सोबत घेवून या कामाचा प्रस्तावाबाबत चर्चा झाली.

 

LEAVE A REPLY

*