विकासासाठी नागरी सुविधांवर भर !

0
धुळे / शहरांचा विकास साधायचा असेल तर पिण्याचे पाणी, सांडपाण्याचा निचरा, सांडपाण्यावरची प्रक्रिया आणि घनकचर्‍याचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे.
या चार बाबींवर लक्ष केंद्रीत शहरांचा जीडीपी वाढण्याशिवाय राहणार नाही. राज्यसरकार त्यासाठी राज्य सरकार आवश्यक तो निधी देण्यास तयार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी केले.
धुळे येथे विविध विकास कामांच्या शुभारंभानिमित्त झालेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, रोजगार हमी योजना व पर्यटन विभाग तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, आ. अनिल गोटे, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, मनपा आयुक्त संगीता धायगुडे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, गावाकडचे लोक आता शहरांकडे मोठ्या संख्येने येत आहे. परिणामी शहरांचा विस्तार वाढत असून त्याठिकाणी आवश्यक त्या सोयी सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.

शहरांचा जीडीपी वाढवायचा असेल तर मुलभूत सोई वाढवा, प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे.

सांडपाण्याचा निचरा झाला पाहिजे. त्यावर प्रक्रिया केली पाहिजे आणि घनकचर्‍याचे व्यवस्थापन करायला हवे. यावर लक्ष केंद्रीत केल्यास शहराच्या विकासासाठी राज्यसरकार आवश्यक तो निधी देण्यास तयार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शेतीचा विकासदर साडेबारा टक्केवर गेला असून यामुळे सुमारे 40 हजार कोटी रुपये राज्यातील शेतकर्‍यांना जास्तीचे मिळाले आहेत.

 

LEAVE A REPLY

*