मुख्यमंत्र्यांच्या सभेवर दगडफेकीचा डाव – आ. गोटे

0
धुळे / मुख्यमंत्र्यांच्या पांझरा नदीवरील सभेवर चौपाटीकडून दगडफेकीचा राष्ट्रवादीचा डाव असल्याचा, आरोप आ.अनिल गोटे यांनी केला आहे.
धुळे शहराचा कायापालट करण्याच्या सुरुवातीस जेवढा अपशकून करता येईल, तेवढा प्रयत्न केला जात आहे.

धुळे शहर शंभर वर्ष मागे नेवून ठेवले आहे. विकासच नव्हे तर जागोजागी अतिक्रमण व गुंडगिरी करुन तरुणांना सट्टा, जुगार, हातभट्टी, डांबर इत्यादी व्यवसायात लावून त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्याला धुळेकरांनी तीनवेळा नाकारले आहे. विकासाच्या कामाला विरोध यापुढे सहन केला जाणार नाही.

मुख्यमंत्र्यांच्या सभेवर दगडफेक करण्याचा डाव राष्ट्रवादीचा आहे, पण तोही खपवून घेतला जाणार नाही, असे पत्रकात आ.गोटे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*