वीज कंपनीवर शिवसेनेचा कंदील मोर्चा

0
धुळे / वाढीव बील, फॉल्टी मीटर, वीज पुरवठा बंद होणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू जळणे व भारनियमन पूर्णत: बंद करावे, या मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर कंदील मोर्चा काढण्यात आला.
गेल्या काही दिवसापासून शहरात नागरिकांना वीज वितरण महामंडळाच्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वीजबिल अव्वाच्या सव्वा येत आहे.
त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबीय चिंतातूर झाले आहे. वाढीव बिलाचा प्रकार थांबवावा तसेच फॉल्टी मिटर ताबडतोब बदलून द्यावे. आठवड्यातून एक-दोन दिवसाआड दिवसभर विजपुरवठा खंडीत होतो.
एका तासात पाच ते सहावेळा विजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडतो. विजपुरवठा कमी-जास्त होत असल्यामुळे घरातील टिव्ही, फ्रिज व अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब होतात, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून चार ते पाच तास भारनियमन सुरु आहे. उन्हाळा सुरु असताना एवढ्या प्रमाणात भारनियमन केले जात असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

त्वरित विज वितरण कंपनीने मागण्यांची दखल घ्यावी, यासाठी शिवसेनेतर्फे कंदील मोर्चा काढण्यात आला.

LEAVE A REPLY

*