कृषी संजीवनी प्रकल्पात समावेश करा!

0
धुळे / राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु केला आहे. 15 जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी होत असून पाच हजार गावांचा यात समावेश आहे.
मात्र, धुळे जिल्ह्याला यातून वगळण्यात आले असून या योजनेत शेतकरी आत्महत्याग्रस्त धुळे जिल्ह्याचा समावेश करावा, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना माजी आ.प्रा.शरद पाटील यांनी सादर केले.

प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्र्यांची प्रा.पाटील यांनी भेट घेतली. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक पाहणी अहवालात राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये धुळ्याचा क्रमांक 28 वा आहे.

इतर जिल्ह्यांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात समावेश केला जातो, मग धुळ्याचा का नाही. कृषी संजीवनी योजनेपासून वंचित ठेवणे कितपत योग्य आहे, असा सवाल प्रा.शरद पाटील यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

*