गुन्हेगारांना व्यासपिठावर न बसविण्याची हमी मिळाल्याने राष्ट्रवादीचा जल्लोष

0
धुळे / गेल्या 15 दिवसापासून धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सर्व शिवप्रेमी नागरिक यांचा लढ्याला विजय मिळाला असून हा खरा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायाच्या अस्मितेचा विजय झाला आहे.
दि 17 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, डीवायएसपी हिम्मत जाधव व शहर पोलीस स्टेशनचे पी.आय वसावे आणि इतर अधिकार्‍यांन सोबत जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळा सोबत एक संयुक्त बैठक झाली.
त्या बैठकीत जिल्हा पोलीस प्रमुखांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळा सोबत चर्चा करून मुख्यमंत्र्याच्या सभेच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार व्हायला नको तुमची भूमिका काय आहे. तुमच्या मागण्या काय आहेत. असे सांगून सामंजस्याची भूमिका घ्यावी असे मनोज मोरे यांना सांगितले.
आमची मुख्यमंत्र्यांची सभा उधळण्याची मानसिकता नाही. परंतु हिंदवी स्वराज्याचे संस्थापक क्षत्रिय कुलवंत, कुळवाडी भूषण, भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पायदळी तुडवणार्‍यास छत्रपती शिवरायांचा वारसा चालवणारे मुख्यमंत्रांच्या व्यासपिठावर स्थान देवून सन्मान देण्याचा प्रयत्न भाजपा व आ. अनिल गोटे यांच्या कडून होणार आहे हा छत्रपतींच्या अस्मितेचा अवमान असून आम्ही तो खपवून घेणार नाही.

प्रसंगी कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी होणारे परिणाम भोगण्याची तयारी आहे असे सांगितले. त्यावर जिल्हा पोलीस प्रमुखांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की तुमची अस्मिता दुखविली जाणार नाही.

छत्रपती शिवराय सर्वांचेच आराध्य दैवत आहेत जो कोणी असे कृत्य करणारा असेल त्याला मुख्यमंत्र्यांच्या व्यासपिठावर प्रवेश देणार नाही व लवकरच हे कृत्य करणार्‍यावर कारवाई करण्यात येईल.

असे आश्वासन दिल्यानंतर शिष्टमंडळाचे समाधान झाले.

 

LEAVE A REPLY

*