यात्रेत दारुविक्री : उपसरपंच गजाआड : सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

0
पिंपळनेर | वार्ताहर :  नार्ंदखी, ता. साक्री यात्रेत दारु विक्री करणार्‍या उपसरपंचाला पिंपळनेर पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून दारुसाठा, क्रूझर गाडी असा दोन लाख १२ हजार २७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, दि. २० मे रोजी नार्ंदखी (उमरपाटा) ता. साक्री या आदिवासी पट्ट्यात यात्रोत्सव होता. या यात्रोत्सवात उपसरपंच कांतीलाल जयवंत कुवर हा क्रूझर गाडीतून दारुविक्री करीत असल्याची गुप्त माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे सहाय्यक निरीक्षक भाबड, उपनिरीक्षक योगेश खटकळ, ललित पाटील, भूषण वाघ, प्रवीण अमृतकर, योगेश चौरे, पंकज वाघ, राजेंद्र खैरनार, नागेश सोनवणे, प्रवीण सोनवणे, ग्यानसिंग पावरा, योगेश वानखेडे, राजेश मिस्तरी, दीपक माळी, शेखर वाडेकर, सागर ठाकूर, धनंजय मोरे, दीपक गायकवाड, अनंद चव्हाण यांच्या पथकाने नार्ंदखी येथे छापा टाकला असता करमणूकीच्या खेळासोबत क्रूझर गाडी (क्र.एमएच१८ एजे ३८३५)मध्ये विक्री करण्यासाठी देशी, विदेशी, गावठी दारुचा साठा ठेवलेला आढळून आला.

पथकाने क्रूझर गाडीसह दारुसाठा असा दोन लाख १२ हजार २७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व उपसरपंच कांतीलाल कुवरला अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*