गुंड गुड्या हत्याप्रकरण : मुख्य संशयित विक्की गोयरला बागलाण तालुक्यातील निताने येथून अटक

0
धुळे | प्रतिनिधी :  येथील कुख्यात गुंड गुड्ड्यांच्या हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी विक्की उर्फ विक्रम शाम गोयर ( वय ३३ वर्ष, रा. अबिका नगर. अरिंहत मंगल कार्यालयाजवळ धुळे) याला धुळे पोलिसांनी आज नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील मौजे निताणे येथून सापळा रचून अटक केली.

गुड्ड्या हत्याप्रकरणातील आतापर्यंत पोलिसांनी १५ संशयीत आरोपींना राज्याच्या विविध भागातून अटक केली आहे. यात आरोपींना आश्रय देणार्‍या व मदत करणार्‍यांनासुध्दा अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधिक्षक एम. रामकुमार, अपर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिम्मत जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आर.पी. परदेशी, सहा,पोलिस निरीक्षक पी.जे. राठोड धुळे शहर व आझादनगर पोलिस ठाणे यांच्या सयुंक्त पथकाने त्यास नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील मौजे निताणे  येथे सापाळा रचून ताब्यात घेत अटक केली.

या गुन्ह्यातील अजुन दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

*