मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात

0
धुळे / मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि.17 मे रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांची जाहीर सभा शहरातील पांझरा नदीपात्रात सायंकाळी सहा वाजता होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरु असून पांझरा पात्राचे सपाटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे
.
सभेच्या प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक, सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर विविध विकास कामांचे लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल.

सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पांझरा नदीपात्राचे सपाटीकरण करण्यात आले आहे.

त्या जागेवर भव्य शामियाना उभारण्यात येणार आहे. सभेचे तयारीकडे आ.अनिल गोटे हे लक्ष ठेवून आहेत.

सभास्थळी त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून तळ ठोकला आहे. सभेसाठी केवळ आता एक दिवस शिल्लक आहे.

LEAVE A REPLY

*