स्त्री सन्मानाची शिकवण प्रभावीपणे राबवा

0
धुळे / स्त्री सन्मानाची शिकवणूक घरातून, शाळेतील अधिक प्रभावीपणे दिली पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.
मातृ दिनाचे औचित्य साधून शहरातील मानसवेद फाऊंडेशनतर्फे राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात सृजनी नृत्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.सबनीस बोलत होते.
पुढे बोलतांना डॉ.सबनीस म्हणाले की, समाज प्रगत झाल्याचा दावा केला जात असताना बालिकेपासून वृध्द महिलेपर्यंत अत्याचाराच्या घटना घडत आहेत.
हे पुरुषी अत्याचार कधी थांबणार आहेत याचा विचार आता सर्वच पातळीवर झाला पाहिजे. अत्याचारात पुरुषांची हलकट मानसिकता दिसते. या महाराष्ट्रात राष्ट्रपुरुष व संतांनी संस्कार व संस्कृती दिली.
अत्याचाराचे प्रमाण लक्षात घेता आपण संस्कृतीचा खरा विकास केला का? असा प्रश्न उपस्थित होतो, असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलतांना डाी.सबीनस म्हणाले की, स्त्रियांच्या सुधारणावादी विचारांवर सर्वच महापुरुष एक आलेले दिसतात. एकेकाळी लावणी या प्रकाराबद्दल प्रतिकूलमध्ये होते.

आज पुण्यासारख्या शहरात खास महिलांसाठी लावणीचे प्रयोग होतात. नृत्य साधनेच्या माध्यमातून महिलांच्या प्रतिभेचा परिचाय होत आहे. ही बाब स्वागतार्ह आहे, असे त्यांनी सांगितले.

समाजात मातृत्वाबाबत आजही भेदभाव केले जातात. वेगवेगळे मतप्रवाह आहेत. ते गैर आहेत. ते थांबवून मातृत्वाकडे निरागस भावनेने पाहिले पाहिजे, असे आवाहन डॉ.सबनीस यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*