Type to search

डॉ़ हटकर, डॉ़ अहिरराव, डॉ़ मिनाक्षी गजभिये यांना दामाकॉन वैद्यकीय पुरस्कार

maharashtra आरोग्यदूत आरोग्यम धनसंपदा आवर्जून वाचाच धुळे

डॉ़ हटकर, डॉ़ अहिरराव, डॉ़ मिनाक्षी गजभिये यांना दामाकॉन वैद्यकीय पुरस्कार

Share
धुळे । प्रतिनिधी :  दामाकॉन पुरस्कार डॉ़ निता हटकर, डॉ़ जयंत अहिरराव आणि डॉ़ मिनाक्षी गजभिये यांना सन्मानपुर्वक देण्यात आला़.

महात्मा फुले व भारतरत्न डॉ़ आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ़ आंबेडकर मेडिकोज असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे दामाकॉन वैद्यकीय शैक्षणिक परिषद आयएमए हॉलमध्ये घेण्यात आली़ यावेळी डॉ़ चंद्रकला दाभाडकर, डॉ़ हेमंत गांगोलिया, डॉ़मंदार म्हस्कर, पत्रकार हेमंत मदाने यांनी मार्गदर्शन केले़.

वैदयकीय क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा दामा भुषण पुरस्कार हिरे महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ़ निता हटकर यांना, साक्री येथील आयएमएचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ औषध वैद्यकशास्त्र तज्ञ डॉ़ जयंत अहिरराव यांना दामा मित्र पुस्कार तर दामा गौरव पुरस्कार हा हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीष्ठाता डॉ़ मिनाक्षी गजभिये यांना प्रदान करण्यात आला़.

या परिषदेला आयएमएचे माजी राष्ट्रीय डॉ़ रवी वानखेडकर, डॉ़ गजभिये, आयएमएचे धुळ्याचे अध्यक्ष डॉ़ राजकुमार सूर्यवंशी, डॉ़ दीपक शेजवळ, डॉ़ तुषार पाटील, डॉ़ योगेश बोरसे, अशिष भिलांगे आदी उपस्थित होते़.

मेडिकोज असोसिएशनतर्फे निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबीर घेण्यात आले होते़ यावेळी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित लघूनाट्य सादर करण्यात आले होते़ यात सौरभ खोब्रागडे, श्रध्दा सातपुते, यश कांबळे, स्वाराज पाटील, विश्वजीत बनसोडे, शुभम निकुंभ, वैभव चव्हाण, अशिष भिलंगे आदी सहभागी झाले होते़ स्त्री सबलीकरण या विषयावर प्रेरणा वळवी, कामना शर्मा, श्रध्दा सातपुते, झारा अन्सारी, रूतुजा बिजहाडे या विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!