आयुक्त धायगुडे यांची मालेगावला बदली

0
धुळे / महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांची मालेगाव महापालिकेत आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा सचिव सुधाकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संगीता धायगुडे यांना आज पद्भार सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाचे सहसचिव ज.ना.पाटील यांनी दिले आहेत.

संगीता धायगुडे यांनी एक वर्षापूर्वी आयुक्त पदाचा पद्भार घेतला होता. त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला असून त्यांनी चार नगरसेवकांना भोगवटा प्रमाणपत्रासाठी नोटीसा बजावल्या होत्या.

त्यामुळे धायगुडे यांना महासभेत धारेवर धरण्यात आले होते. तसेच त्यांच्या निवासस्थानावरही अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली होती. त्यांनी महापालिकेच्या कर्मचार्‍यांना शिस्तही लावली. स्वच्छता मोहिमही त्यांनी शहरात राबवली होती.

आयुक्त संगीता धायगुडे यांची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार मालेगाव महापालिकेत आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांना आजच धुळे आयुक्त पदावरुन कार्यमुक्त करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

देशमुख नवे आयुक्त
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा सचिव सुधाकर देशमुख यांची संगीता धायगुडे यांच्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नेमणुकीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन्ही अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.

LEAVE A REPLY

*