Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच धुळे

धुळ्यात 10 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

Share
धुळे । प्रतिनिधी :  धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूकीत आतापर्यंत दहा जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यात आज पाच जणांना समावेश आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल रेखावार यांनी दिली आहे.

धुळे लोकसभा मतदार संघात दि. 2 एप्रिलपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर आज दि. 8 एप्रिल रोजी दीपक खंडु अमृतकर (अपक्ष), पंढरीनाथ चैत्राम मोरे (भारतीय ट्रायबल पार्टी), कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस), मेराज बी हुसेन खान (अपक्ष दोन अर्ज) आणि कास्मी कमाल हाशिम मोहम्मद आजमी (वंचित बहुजन आघाडी) या पाच जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

दि. 5 एप्रिल रोजी मिर्झा ताहिर बेग समद बेग, पंढरीनाथ चैत्राम मोरे, ज्ञानेश्वर बळीराम ढेकळे, नितीन बाबुराव खरे, अनिल रामदास जाधव या पाच जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. आतापर्यंत दहा जणांनी अर्ज दाखल केले आहेत. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत 9 एप्रिलपर्यंत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!