पिंपळनेर येथे संप यशस्वी : बाजार समिती बंद

0
पिंपळनेर / पिंपळनेर येथे शेतकर्‍यांचा संप शंभर टक्के यशस्वी झाला. ऊस, भाजीबाजार, फळ बाजार पूर्ण बंद होते. कुडाशी आदिवासी भागातही शेतकर्‍यांनी संपात सहभागी होवून बंद यशस्वी केला.
उद्या शुक्रवारी आठवडे बाजारही बंद ठेवून शेतकरी स्टॅन्ड चौफुलीवर आंदोलन करणार आहे.
आज दि. 1 जून रोजी सकाळी सहा वाजेपासून पिंपळनेर चिकसे, बल्हाणे, देगाव, येथील शेतकरी व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आवाहन करत भाजीपाला, आंबे, फ्रुट विक्रेत्यांना बंदची हाक देत संपाचे आवाहन केले.

यावेळी सर्व भाजीपाला विक्रेते, फु्रट विक्रेत्यांनीही आमचा व्यवसाय शेतकर्‍यांवर अवलंबून असून शेतकर्‍यांच्या संपाला पाठिंबा देत व्यवसाय बंद ठेवले.

शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष भटू आकलाडे, उत्तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे उपाध्य शशिकांत भदाणे, शांताराम गांगुर्डे (माजी तालुकाध्यक्ष), नारायण भदाणे, संदीप शिवाजी आकलाडे, अतुल खैरनार, संजय जगताप चिकसे उपसरपंच, महेश गांगुर्डे, राहुल पाटील, महेंद्र जगताप, अजय सूर्यवंशी, किशोर काळे, हर्षल वाघ, राहुल कदम आदी यावेळी उपस्थित होते.

बल्हाणे येथील शेतकरी देविदास दाभाडे, बाळू बिरारीस, जितेंद्र बिरारीस, देविदास अहिरे, दीपक अहिरे, पंकज बिरारीस, महेंद्र बिरारीस, विशाल कुंवर व अनेक शेतकरी एकत्रीत येवून पिंपळनेर व परिसर शेतकरी संपाचे आवाहन केले.

त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. 100 टक्के बंद यशस्वी झाला असून उद्या दि.2 रोजी पिंपळनेर स्टॅन्ड चौफुलीवर आंदोलन करण्यात येणार असून उद्या शुक्रवारी आठवडे बाजारही बंद ठेवण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी पिंपळनेर पोलीस ठाण्यावर जावून शेतकर्‍यांनी निवेदन दिले.

LEAVE A REPLY

*