अशोक चव्हाण आज शिंदखेड्यात

0

शिंदखेडा । शिंदखेडा नगरपंचायत निवडणुक प्रचारासाठी येथे काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत. शहरातील गांधी चौकात उद्या दि.8 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ही सभा होणार आहे.

यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी, उपस्थित राहणार आहेत. शिंदखेडा नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने उमेदवार दिले असून नगराध्यक्षपदासाठी श्रीमती मालती शामकांत देशमुख या निवडणूक लढवित आहेत.

प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्यात आली आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, काँग्रेस नेते सुरेश देसले यांनी केले आहे. सकाळी 9 वाजता एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांचे हेलिकॉप्टरने आगमण होईल.

LEAVE A REPLY

*